प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : कोकणातील जगप्रसिद्ध हापुस आंब्याची चव चाखणाऱ्या आबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी हापूस आंब्याची चव आता वर्षभर चाखता येणार आहे. तशी किमया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील नेमळे गावातील आंबा व्यावसायिक गुरुप्रसाद नाईक यांनी कोल्ड स्टोरेज मध्ये नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा साठवुण केली आहे. त्यामुळे वर्षभर हवा तेव्हा आता हापूसची चव चाखता येणार आहे. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा कोल्ड स्टोरेज मध्ये विशिष्ट तापमानाला साठवून ठेवला तर तो वर्षभर टिकतो. त्यासाठी गुरुप्रसाद नाईक यांनी गेली दोन वर्ष प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळत आहे. आता शासनाने कोकणातील आंबा बागायदारांना अश्या प्रकारे कोल्ड स्टोरेज करण्यासाठी व्यवस्था करून दिल्यास आंबा बागायदारांना वर्षभर रोजगार सुध्दा मिळेल आणि आंबा खवय्यांना चव देखील चाखता येईल.
