प्रतिनिधी, नाशिक : शिस्तबद्ध पडणारी पाऊल, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये ३९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने डोळ्यांची पारणे फेडणारा ठरला. नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लढाऊ वैमानिकांच्या दीक्षांत सोहळ्याचे, कॅट्सच्या हवाई तळावर लष्करी थाटात दीक्षांत संचलनाला सुरुवात झाली. २१ जणांच्या वैमानिकाच्या या तुकडीचे मुख्य आकर्षण होते. ते चित्त थराराक प्रात्यक्षिके गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशनच्या दीक्षांत सोहळ्यास लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांची उपस्थिती होती. दरम्यान युद्धाच्या वेळी महत्वाची साथ देणार्या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधित त्यांच्याकडून संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. यामध्ये शत्रुंवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमीना सुरक्षित ठिकाणी उपचार्थ हलविणे आदीसह विविध बाबींचे सखोल ज्ञान दिले जाते.
