प्रतिनिधी, औरंगाबाद : येथे एका हळदी च्या कार्यक्रमा प्रसंगी नातेवाईक व शिल्लेगाव पोलीसांची डिजे बंद करण्या वरून वादविवाद झाल्याने ५ आरोपीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेत असलेल्या दोन आरोपींची शिल्लेगाव पोलिसांनी लासूर स्टेशन येथील बाजार पेठेतील मुख्य रस्त्यावरील पोलीस चौकीतुन ते प्राथमिक आरोग्य केद्रापर्यत दोन आरोपीची पायी धींड काढण्यात आल्याच्या आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संतप्त ग्रामस्थांनी लासूर स्टेशन पोलीस चौकीला घेराव घालुनलासूर स्टेशन बंद चे निवेदन देण्यात आले होते. आज गावकऱ्यांनी सकाळीच स्वयंस्फुर्तीने दुकानें बंद ठेवली होती. तोपर्यंत शिल्लेगाव पोलिसांनी यां बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र गावकऱ्यांनी सांमजश्याची भूमिका घेत पोलिसांना सहकार्य करत आरोपीचे नातेवाईक व गावाकऱ्यांचे शिष्टमंडळ यांनी पोलीस चौकीत पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्याशी बैठक घेऊन एक तासानंतर बंद मागे घेतला. हा बंद यशस्वी झाला त्यामुळे गावकऱ्यांनी व्यापारी वर्गाचे आभार मानले तद्नंतर दुपारनंतर सर्व व्यावसायिक आस्थापणे सुरळीत चालू झाले होते.
