जनतेज न्युज

गंगापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा थर्माकोलच्या तराफ्यावर बसून विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेणा प्रवास शासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी, औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अनेक पुनर्वसन झालेल्या गावातील वसाहतीमध्ये जाण्यासाठी लोकांना जुन्याच साधनसामुग्रीचा आणि तराफ्याचा वापर करावा लागत आहे.गोदावरी काठावरील पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांतील मुलांना दररोज अशाच पद्धधतीने शाळेमध्ये जावे लागत असून रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी थर्माकोलवर बसून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे भिवधानोरा येथील शाळेत जाण्यासाठी लहान मुले थर्माकोलच्या तराफ्यावर बसून जीव धोक्यात घालून शाळेत ये- जा करतात विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुटावा म्हणून गंगापूर तालुक्याचे आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शेळके पाटील, विष्णू काळे,आणि परिसरात राहणाऱ्या पालक मंडळीनी गंगापूर तालुक्याच्या तहसीलदाराकडे विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बोट आणि लाईफ जॅकेट ची मागणी केली होती मात्र प्रशासनाकडून ती पूर्णत्वास न गेल्याने आजही या विद्यार्थ्याचा हा जीवघेणा प्रवास चालूच आहे एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी धडपड करणारे प्रशासकीय अधिकारी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर अशा ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधत नसतील तर देश बदल रहा हैअसे म्हणणे कितपत योग्य असा सवाल? देशातील अशा अनेक असुविधा जन्य घटनांतून आक्रोश करत आहे.