जनतेज न्युज

गणपतीच्या डोळ्यात पाणी येत असल्याच्या अफवेने दर्शनासाठी भक्तांची गर्दी

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरातील होटगी - कुंभारी रोडवरील गणपती मंदिरातील गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
यामुळे भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.दरम्यान, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.कुंभारी रोडवरील स्वामीनारायण गुरुकुल स्कूलच्या जवळ सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी बेनक गणपती मंदिर आहे.या गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची वार्ता हा हा म्हणता परिसरात पसरली. भाविकांनी लागलीच दर्शनासाठी गर्दी करून हार,श्रीफळ अर्पण केले.
दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून ही अफवा असून या मागचे शास्त्रीय कारण काय त्याचा शोध घेतल्यानंतर नेमका प्रकार निदर्शनास येईल असे स्पष्ट केले आहे.