प्रतिनिधी, औरंगाबाद : समर्थ रामदास स्वामी पूजा करत असलेल्या श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणच्या प्राचीन मुर्त्या गेल्या आहे. जालना येथील जांबसमर्थ मधून चोरी गेलेल्या मूर्त्यांवर इतिहास अभ्यासक डॉक्टर संजय पाईकराव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या जुन्या मुर्त्या लाखो करोडो रुपयांच्या असतात त्यामुळे त्यांचे ए.एस. आय. भारतीय पुरातत्व विभागाला रजिस्ट्रेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन केले असल्यास अशा ऐतिहासिक मुर्त्या चोरीला गेल्यास तर, त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आपल्याला परत मिळू शकतात. त्यासाठी आपल्या गावांमध्ये शहरांमध्ये असलेल्या अशा ऐतिहासिक मुर्त्यांचे संरक्षण हे नागरिकांनी आणि त्या संस्थान चालकांनी करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. असे मत इतिहास अभ्यासक डॉक्टर संजय पाईकराव यांनी व्यक्त केले आहे.
