जनतेज न्युज

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासाकरीता रायगड पोलिस सज्ज

प्रतिनिधी, रायगड : गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा महत्वाचा सण मानला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून अनेक नोकरदार हे कोकणातील आपल्या घरी जातात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुमारे 145 किलोमीटरच्या मार्गावर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तर, रायगड जिल्ह्यातील या मार्गावरील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे.
गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई ठाणेचा नोकरदार कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत. या मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून 5 उपविभागिय अधिकारी, 50 पोलिस अधिकारी व 225 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आसल्याचे रायगड जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी वडखळ येथे सांगितले.