प्रतिनिधी, जळगाव : गणेश उत्सव काही दिवसांवर आल्याने नगरपरिषदेचे नाट्यगृहात चोपडा तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांचे शांतता कमिटीची बैठक महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत चोपडा शहरात पाच दिवसाचे गणेशोत्सव साजरा केला जातो व पाचव्या दिवशी गणरायाचे विसर्जन केल जाते. या विसर्जनाच्या वेळी गणेश मंडळांना व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराव सचदेव पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळराव सोनवणे आबा देशमुख पंकज पाटील रवी मराठे राजू बिटवा प्रदीप पाटील महिंद्र धनगर यांच्यासह गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सांगितले की कोरोनाचे सर्व निर्बंधाचे मुक्तीसह हा गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. या गणेशोत्सवाला शांततेत व कायदा सुव्यवस्था राखत गणेश मंडळांशी समन्वय सादत हा उत्सव साजरा करण्याच्या संदर्भाची सूचना करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेशाचे पालन करा व पोलिसांना सहकार्य करा असे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केले. या बैठकीला तहसीलदार अनिल गावित अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , ॲडिशनल पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम, पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण, देविदास कुंनगर , एपीआय अजित सावळे, किरण दांडगे , घनश्याम तांबे, संतोष चव्हाण यांच्यासह चंद्रहास भाई गुजराती किशोर चौधरी पुंडलिक महाजन अनिल वानखेडे, प्रवीण भाई , गुजराती गजेंद्र जयस्वाल , हुसेन दादा पठाण, विकास पाटील, प्रदीप पाटील, कैलास सोनवणे , नरेश महाजन यांच्यासह चोपडा शहर व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
