जनतेज न्युज

गणेशोत्सव करिता इकोफ्रेंडली सजावट साहित्य बाजारात दाखल ; साहित्य किमतीत 20 ते 25% वाढ

प्रतिनिधी, नाशिक : गणेश उत्सव अवघ्या 8 दिवसावर येऊन ठेपला असून गणेश उत्सवा करता लागणारे साहित्य येवल्यातील बाजारात दाखल झाले असून यावेळी इको फ्रेंडली सजावट साहित्य बाजारात आले. गणेश उत्सव करता लागणाऱ्या सजावट साहित्य बनवण्यात कारागिरी सध्या व्यस्त असून मखर, फुलांच्या माळा, पताका आदि सर्व गोष्टी या इको-फ्रेंडली असून या सजावट साहित्यच्या किंमतीत मध्ये 20 ते 25 टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. थर्माकोल बंदी असल्यामुळे बाजारात कागदापासून,पुष्ट्यापासून असे इकोफ्रेंडली सजावट साहित्य विक्रीस आले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटामुळे सजावट साहित्य कडे गणेश भक्तांनी पाठ फिरवली होती. मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने नक्कीच गणेश भक्तांचा इको फ्रेंडली साहित्य खरेदीकडे कल वाढताना दिसत आहे.