जनतेज न्युज

घटस्थापना एका दिवसावर आल्याने चोपड्याच्या बाजारात देवीचे मूर्तींचे आगमन

प्रतिनिधी , जळगाव : घटस्थापना एका दिवसावर आल्याने नवरात्र उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे यावर्षी कुठलंही निर्बंध नसल्याने दुर्गा भक्तांमध्ये उत्साह दिसत आहे त्याचप्रमाणे मूर्तीच्या उंचीवर कुठलेही निर्बंध नसल्याने दुर्गा देवीचे मूर्तीचे बाजारात आगमन झालेले आहे यावर्षी सर्वच वस्तूंमध्ये तसे कच्च्या मालामध्ये भाव वाढ झाल्याने मूर्तींच्या किमतीत देखील 30 ते 35 टक्क्यांनी भावात वाढ झालेली आहे मूर्ती हे बाहेरून आणावे लागत असल्याने येण्या-जाण्याचा खर्च वाहतूक खर्च लागत असल्याने मूर्तींची किमतीत वाढ होत आहे परंतु दुर्गा मंडळाचे पदाधिकारी मूर्ती घेत असताना भाव करत असल्याने मूर्ती विक्रेते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सर्वच वस्तूंमध्ये भाव वाढ झाल्याने मूर्तींमध्ये ही वाढ झाली असल्याची समजवण्याच्या प्रयत्न करावा लागत असल्याचे मूर्ती विक्रेते सांगत आहे.