प्रतिनिधी , औरंगाबाद : मराठवाड्यामधील वित्तीय समावेशन त्याच बरोबर प्रधानमंत्री यांच्या महत्त्वकांशी योजनांचा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार. विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक 26 सप्टेंबर 2022 घेण्यात येणार आहे. या आढावा बैठकीसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, सहकार आणि पणन त्या जोडीला मत्स्य पालन उपायुक्त सर्व जिल्हा अग्रणी बँकांचे • व्यवस्थापक मराठवाड्यातील नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह बँकिंग आणि महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे. या आढावा बैठकीमध्ये प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण योजना यामध्ये स्वनिधी याचबरोबर सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात अटल पेन्शन योजना इत्यादी योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री भागवत कराड यांनी दिले आहे ग्रामपंचायत स्तरावर 75 दिवस वित्तीय समावेशन करणार आहे भारत सरकारने वित्तीय समावेशन योजनेअंतर्गत घरातील पाच जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील पाच जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून ग्रामपंचायत स्तरावर ७५ दिवस गलतीने असल्याचे यावेळी भागवत कराड म्हणाले.
क्रिप्टो करन्सीच्या ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून भारतामध्ये येणार डिजिटल रुपया. या डिजिटल रुपये मध्ये प्रत्येकाला एक आयडी नंबर दिल्या जाईल आणि त्याच आयडी नंबर वरून स्वतःचे अकाउंट सेटलमेंट होईल आणि यावरून रिटेल व्यवहार करता येतील याचा फायदा असा होईल की, कुठेही ब्लॅक मनी राहणार नाही, भ्रष्टाचार करता येणार नाही , छपाईसाठी जो खर्च होतो तो खर्च सुद्धा कमी होईल यासाठी डिजिटल बँक तयार झाल्या असून, लवकरच पंतप्रधान उद्घाटन करतील या सर्व डिजिटल रुपयावर भारत सरकार आणि रिझर्व बँकेचे कंट्रोल असेल अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे.
