जनतेज न्युज

आमदार संतोष बांगर हल्ल्या प्रकरणी कार्यकर्ते आक्रमक; अंजनगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

प्रतिनिधी, अमरावती : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी या ठिकाणी त्यांच्या गाडीवर जो हल्ला झाला त्याचा निषेध एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन समोर जाऊन केला, जोपर्यंत हल्ल्या करणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल होणार नाही त्यांना अटक केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती,अंजनगाव पोलीस स्टेशन समोर शिंदे गटाने जोरदार निदर्शने दिली, दरम्यान पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांनी हल्ला केलेल्या आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तासाभरात आंदोलन संपले तर काही नावे निष्पन्न झाली असून 15 ते 16 आरोपी असू शकतात लवकरच आरोपीना अटक करू अशी माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली तर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिंदे गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट यांनी दिला.