प्रतिनिधी , सोलापूर : बार्शी तालुक्यात झालेल्या तुफान पावसामुळे श्रीपत पिंपरीतील घोरवड्याला पूर आला आहे. या पाण्यातून ग्रामस्थ जीव व्हाचावण्यासाठी धडपड करत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहवून ही गेले, मात्र गावाच्या तरुणांनी वेळीच सतर्कता दाखवत या जेष्ठ ग्रामस्थांचा जीव वाचवला आहे.
गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची कमी असल्याने नेहमीच या ओढ्याच्या पाण्यातून ग्रामस्थ वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने वेळीच लक्ष घालून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
