जनतेज न्युज

सर्वसामान्य कामगार संघटनेच्या वतीने मोर्चा

प्रतिनिधी , नांदेड : आज सर्वसामान्य कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया वरती मोर्चा काढण्यात आला आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने कामगारांसाठी मध्यम भोजनालय ही योजना चालू केली असून ती बंद करण्यात यावी कारण ते जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे व काही कामगार हे भोजन घेतल्यानंतर बीमार पडत आहेत. ही योजना बंद करून त्याऐवजी जी काही भोजनाची रक्कम होते ती आमच्या खात्यामध्ये टाकावी जेणेकरून आम्ही आमचं जेवण करून खाऊ शकतो व जे राज्य शासनामार्फत कीट देण्यात येते कामगारांना त्यामधील देखील समान निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे चांगल्या दर्जाची किट आम्हाला देण्यात यावी जेणेकरून आम्ही काम करत असताना कुठलीही दुखापत कामगाराला होणार नाही अशी देखील मागणी करण्यात आली आहे. आमच्या मागण्या त्वरित राज्य शासनाने मान्य कराव्या अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.