प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सुरु असणारा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे लांबोटी – शिरपूर रस्त्यावर एक बाभळीच झाड कोसळून पडले आहे.
यामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग मोहोळ कडून याची अद्याप दखल घेतली नसल्याने झाड रस्त्यावरच पडून आहे, त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. याच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडून झाडावर चडून आंदोलन करण्यात येत आहे.जोपर्यंत रस्त्यावरून झाड हटवल जाणार नाही तोपर्यंत झाडावरून खाली उतरणार नाही अशी भूमिका प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहोळ तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी घेतली आहे.
