प्रतिनिधी , धुळे : सेवानिवृत्तीनंतर ग्रेड पे (पेन्शन) मिळावे याकडे धुळे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज पासून उपोषणाला सुरवात केली आहे. आजपासून सदरचे कर्मचारी धुळे मनपाच्या आवारात उपोषणाला बसले आहेत.ग्रेड पे (पेन्शन) दुरुस्त करून मिळावी या मागणीसाठी धुळे महानगर पालिकेच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून धुळे महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिले होते. परंतु, या मागणीकडे धुळे महानगर पालिका प्रशासना कडून सर्रासपणे दुर्लक्ष केले यामुळे अखेर सेवानिवृत्त धुळे महानगर पालिका कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे. ग्रेड पे चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याने या सेवानिवृत्त धुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. या कर्मचाऱ्यांनी धुळे महानगरपालिका प्रशासनाकडे ही मागणी केली असून, अखेर प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी धुळे मनपाच्या आवारातच आमरण उपोषणाला आज पासून सुरुवात केली आहे.
