जनतेज न्युज

गुलाबाई उत्सवासाठी मुर्ती बाजारात दाखल

प्रतिनिधी , जळगाव : ग्रामदैवत गुलाबाईच्या उत्सवाला उधाण आले असून, महिलावर्ग या उत्सवात रंगून गेल्या आहेत. गणपती विसर्जनानंतर ग्रामदैवत गुलाबाईची ठिकठिकाणी स्थापना करण्यात येते. महिलांनी गुलाबाईच्या मुर्ती विकत घेण्यासाठी गर्दी केली आहे. गुलाबाईच्या मूर्तीची विधिवत स्थापना केली जाते. या उत्सवात महिला एकत्र येऊन यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवित असतात. रोज सकाळी गुलाबाईची आरती, विविध मनोरंजक खेळ, गाणी, प्रसाद वाटप यात रंगून जातात. रात्री उशिरापर्यंत महिला व मुलींचा यात सहभाग लक्षणीय असतो. या खेळातून सांघिक वृत्ती वाढत असून, रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना चांगला विरंगुळा मिळून त्यांच्यावरील कामाच्या बोजातून त्यांना निखळ आनंदाची अनुभूती मिळत असते. आज शनिवारी पाचोरा येथील बाजारात ठिक ठिकाणी गुलाबाई च्या मुर्ती विक्री साठी दुकाने थाटण्यात आले होते.