जनतेज न्युज

‘मला आमदार झाल्या सारखे वाटते’ गाण्यावर ठाणेदारांनी ठेका धरत वाढवला पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह

प्रतिनिधी , बुलडाणा : भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे, सर्वच जाती-धर्माचे सण-उत्सव मोठ्या उत्सवात साजरे केले जातात, मात्र सर्वसामान्य जनतेला निर्भय आणि निश्चिंत पने आपले सण उत्सव साजरे करता यावे, यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी 24 तास आपली ड्युटी बजावत असतात. त्यांना कुठलाही सण उत्सव आपल्याप्रमाणेच साजरा करता येत नाही. तरीही, आपला आनंद तोच त्यांचा आनंद, असं समजून आपली सेवा बजावत असतात. तर तब्बल दोन वर्षानंतर या वर्षी गणेशोत्सव साजरा झालाय, आणि बुलढाणा शहरात गणेश विसर्जनाला कुठलेही गालबोट न लागता अतिशय शांततेत विसर्जन पार पडले, याच आनंदात दुसऱ्या दिवशी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात स्थापित असलेल्या गणरायाला देखील निरोप देण्यात आला, आणि यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये एकच आनंद पाहायला मिळाला.यावेळी ठाण्यात पोलीस अधिकारी कर्मचारी, महिला कर्मचारी या सर्वांनी चांगलाच ठेका धरला.. तर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी देखील सपत्नीक गाण्यावर ताल धरत, आपल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला.