प्रतिनिधी, नाशिक : गुंगीकारक औषध देऊन वाहनचालकांना लुटणाऱ्या एका टोळीला नाशिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली असून या टोळीकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. टोळीची प्रमुख एक महिला असून ति ट्रॅव्हल्सची गाडी बुक करायची त्यानंतर गाडीत बसल्यानंतर काही अंतरावर तिच्या साथीदारांना गाडीत बसवून घेत वाहन चालकाला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करायची आणि त्यानंतर गाडीसह वाहनचालकाकडील दागिने, मोबाईल घेऊन ही टोळी पसार व्हायची. नाशिकमध्ये दोन तर, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाची अशाप्रकारे लूटमार या टोळीने केल्याचे तपासात उघड झाले आहे. चारचाकी वाहने, दागिने आणि मोबाईल या टोळीकडून हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
