प्रतिनिधी , औरंगाबाद : काल निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी हा निर्णय निवडणूक आयोगाने कोणात्या दबावाखाली घेतला आहे असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच या निर्णयावरून गल्लीतील लहान मुलगाही सांगेल की हा निर्णय दबावाखाली घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. शिंदे गटाचा हा अट्टाहास होता का ? हा भाजपचा कुटिल डाव आहे. त्यांना कुठलाही राजकीय पक्ष नको आहे. असेही अंबादास दानवे म्हणाले.
