प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : शिवसेनेच्या चीन्हा संदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर राष्ट्रवादी चे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अंतिम आदेश नाही ,शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं म्हणजे शिवसेना कार्यकर्त्याचं रक्त गोठवल असं नाही …मुंबईला होणारी पोट निवडणूक होतेय त्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेवाराच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहणार,निवडणूक आयोगाने जरी अशा प्रकारचा निर्णय दिला असला तरी उमेदवाराचा विजय निश्चित आहे ,निर्णय देत असताना फक्त चीन्हाबाबत नाही तर शिवसेनेचं नाव ही वापरू नका ,अशा प्रकारचा निर्णय दोन्ही गटावर आहे ,एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार देखील या निवडणुकीत नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा आमच्या साठी आश्चर्याचा धक्का आहे ,निवडणुकीत थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी घडतात का अशी शंका लोकांच्या मनात आहे ,एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार नसताना हे चिन्ह गोठवण्यात आलं ,शिवसेना नाव गोठवण्यत आलं हे कुठेतरी मनाला वेदना देणारे आहे असे सांगितले .
