जनतेज न्युज

ही लोकशाही आहे यामध्ये काम करत असताना सगळ्यांचा विचार करायचा असतो – अजित पवार

प्रतिनिधी, नागपुर : अश्या प्रकारच्या धमक्या येत असतात. केंद्र सरकारच्या यंत्रणांनी यात लक्ष द्यावे.  कोणत्याही राज्याच्या संदर्भात अश्या प्रकारच्या धमक्या येतात त्यावेळेस केंद्रापासुन लक्ष देऊन त्या पाठीमागे कोणती शक्ती आहे. म्हणजे कोणी अतिरेकी आहे का हे तपासले पाहिजे. पोलिस भरती, शिक्षिकांची भरती का घेत नाहीत. कोणालाही विश्वासात न घेता आले यांच्या मनात की केले जाहिर ही लोकशाही आहे या मध्ये काम करत असताना सगळ्यांचा विचार करायचा असतो. गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या सरकारच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित करत हा मुद्दा या अधिवेशनात लावून धरणार असल्याचं विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट, धारणी भागात कुपोषण आणि बालमृत्यू चे प्रमाण जास्त आहे. गेल्या महिन्याभरात 100 अशा घटना घडल्याची माहिती आहे, आज तिथे जाऊन आढावा घेऊ आणि सोमवारी अधिवेशनात मुद्दा उचलणार असल्याचं त्यांनी सांगितले.