प्रतिनिधी , पुणे : पुण्यातील हिंजवडी हे क्षेत्र आय .टी. सेंटर क्षेत्र जागतिक दर्जेचे बनले आहे. या क्षेत्रात जगभरातील इंजिनिअर्स येत असतात. त्यामुळे या भागाचा अनन्य साधारण महत्व निर्माण झाला आहे. तथापि हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सुरू असलेल्या वेश्या व्यवसायने उग्र स्वरूप धरण केला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत यापूर्वी अवैद्य २/४ स्पा मसाज पार्लर सुरू होते. तथापि मागणी वाढल्याने हिजवडी पोलीस स्टेशन भागात सुमारे ३०/४० स्पा मसाज पार्लर नावाखाली वेश्या व्यवसायचा गोरख धंदा सुरू आहे. स्पा पार्लर यांनी वेगवेगळ्या ॲप्सवर तसेच इतर सोशल मीडियावर जाहिराती करून वेगवेगळ्या देशातील तसेच आंतरराज्य वेगवेगळ्या प्रांतातील मुलीबरोबर शारीरिक संबंधाच्या जाहिराती प्रसारित करीत आहेत. एखाद्या स्पा पार्लरने एक सवलत जाहीर केली की वेगळेच दुसरे पार्लर चालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीची जाहिरात करीत आहेत. हिजवडी भागात टुरिझम सेक्स रॅकेट वेगात सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच एवढ्याअवाढव्य वाढलेल्या वेश्या व्यवसाय कडे पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे दिसून आल्याने खरे तर हा गोरख धंदा पोलिसांच्या की अंडरवर्ल्डचा असा प्रश्न निर्माण होत आहे. ( क्रमशः) हिंजवडी मधील एक पोलिसाबरोबर काय फोनवरचर्चा झाली कोण काय उकल केली पहा पुढील भागात
