जनतेज न्युज

हिंगणघाट येथील आ.समीर कुणावार यांनी लोकहीतार्थ मांडले सभागृहात प्रश्न

प्रतिनिधी, वर्धा : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन दिनांक १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत मुंबई येथील विधानभवनात पार पडले. हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी विधानसभा क्षेत्रातील समस्या मार्गी लावल्या तसेच राज्यातील वेगवेगळ्या ग्रामीण भागातील बैल,गाय व इतर जनावरांवर अचानक आलेल्या रोगांमुळे मृत्यू होत असल्याने रोगांचे निदान सुद्धा लक्षात न येत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी तसेच जनावरांचे पालन पोषण करणारे बांधव हवालदिल झाले असल्याने यावर सरकारच्या वतीने तातडीने उपाययोजना कराव्या या मागणीची लक्षवेधी मांडून ही गंभीर बाब सरकारच्या लक्षात आणून देताच. मा.विधानसभा अध्यक्ष महोदयांनी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या.आणि आज पशुसंवर्धन विभाग नागपुर चे अधिकारी डाक्टर बी आर रामटेके, विभागीय सह आयुक्त, व डाक्टर पूंडलिक बोरकर जिल्हा उपायुक्त यानि उमरी येड़े मध्ये पाहनी केलीआणि पशु पालकांना निर्देश देण्यात आले