प्रतिनिधी, अमरावती : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार वादातीत विधाने करुन महाराष्ट्रातील मराठी जनतेचा नेहमीच अपमान करतात.अलीकडेच त्यांनी ‘महाराष्ट्रातून गुजराथी व राजस्थानी लोक निघून गेल्यास मुंबईतील पैसा निघून जाईल”. हे वक्तव्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचा अपमान करणारे आहे असा आरोप करण्यात आला,त्यामुळे राज्यपाल पदावरुन कोश्यारी यांना ताबडतोब हटविण्यात यावे.यासाठी महाराष्ट्रनिष्ठ समाज बांधवाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध मोर्चा काढण्यात आला. तर ८ऑगस्ट पर्यत राज्यपालांना न हटवल्यास ८ऑगस्ट रोजी क्रांती दिनी संपूर्ण महाराष्ट्राभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्या मार्फत राष्ट्रपतीना निवेदन देण्यात आले.
