प्रतिनिधी, नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी कर्मचारी ग्रुप व शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी रॅली काढली असून यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करत आदिवासी दिन साजरा केला. आदिवासी मुलांचे वस्तीगृह येथून विद्यार्थी विद्यार्थ्यांनी रॅली काढून विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत येऊन इथून आदिवासी बांधव एकत्र होत महात्मा फुले नाट्यगृह पर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी पोषक घालत आदिवासी नृत्य सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
