जनतेज न्युज

झोपेत असलेल्या पत्नीला उठवून एक्सप्रेस ट्रेन खाली ढकलले, वसई रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

प्रतिनिधी, वाशीम : माणसाच्या क्रूरतेचे उदाहरण वसईतील एका घटनेने समोर आले आहे. वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म वर झोपलेल्या पत्नीला तिच्या पतीने ट्रेन खाली  ढकलले आहे. या घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म वर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचा संपूर्ण थरार चित्रित झाला आहे. सोमवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास वसई रेल्वे स्थानकात पत्नी झोपेत असताना तिच्या पतीने तिला अचानक उठवले. त्यांनतर अचानक भरवेगात येणाऱ्या एक्सप्रेस मेल ट्रेन खाली त्याने पत्नीला ढकलून दिल्याचे सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसून येत आहे. या  माणसासोबत त्याची दोन असल्याचेही दिसून येत आहे. पत्नीला ट्रेन खाली ढकलल्यानंतर  तो पळून जाताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्याने केलेल्या या क्रूर कृत्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. वसई रेल्वे पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेतला जात आहे.