जनतेज न्युज

जीके सोलार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली सोलार पंप बसवलेल्या शेतकऱ्यास दादागिरीची भाषा

प्रतिनिधी, जालना : जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम सोलार योजने अंतर्गत गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ऑनलाइन अर्ज भरले होते.त्यातील अनेकांना सोलार पंपासाठी निवड झाल्याचे एसएमएस आले आहे. सात दिवसाच्या आत पैसे भरणा करण्याचा मॅसेज ही पात्र शेतकऱ्याला महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणा कडून प्राप्त झाला आहे, शेतकरी ऑनलाईन रक्कम भरणा करत आहेत.ज्या निवड झालेल्या शेतकऱ्यांनी रकमेचा भरणा केला आहे.यातील अनेकांना सोलार पंप बसवण्यात आले आहेत.अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील लक्ष्मीबाई गटकळ यांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला. लक्ष्मीबाई यांची बारसवाडा शिवारात गट नंबर २९० मध्ये १ हेक्टर तर गट नं २९१ मध्ये १.५१ आर जमीन आहे. दोन्ही गटात स्वतंत्र एक विहीर व बोअरवेल आहे. योजनेत त्यांचा अर्ज मजूर झाल्याचा मॅसेज प्राप्त झाल्याने त्यांनी दि ६ मे २०२२ रोजी दोन्ही अर्जाची शेतकरी हिस्स्याची १९,३८० रुपये प्रति सोलार पंप प्रमाणे मेडा च्या वेबसाईटवर ऑनलाईन पैसे भरले.यानंतर जिके सोलार कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही गटात सोलार युनिट ११ जुलै रोजी बसवण्यात आले.दोन्ही सोलार पंप व्यवस्थित सुरू झाले.मात्र या जीके सोलार कंपनीच्या अंकूश जाधव नावाच्या अधिकाऱ्याकडून गटकळ यांना गेल्या दोन आठवड्यापासून सातत्याने एक सोलार पंप खोलून नेण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत.गटकळ यांचे कुटुंबीय जाधव यांच्या फोन वरील अरेरावी व दादागिरीच्या बोलण्याने दहशती मध्ये आहे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती अर्जुन गटकळ यांनी केली आहे.