जनतेज न्युज

जिल्हा क्रीडांगणावर आंतरराष्ट्रिय फुटबॉल प्रशिक्षणासाठी शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धाना प्रारंभ

प्रतिनिधी, यवतमाळ : आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षण संस्था असलेल्या म्युनीच येथील फुटबॉल क्लब मध्ये राज्यातील २० खेळाडूंना पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने F.C.बायर्न कप साठी १४ वर्षा खालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन वाशिम येथे करण्यात आले. स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता तसेच आकाशवाणी जिल्हा प्रतिनिधी सुनील कांबळे, रफिक मामू , गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेतून निवड झालेल्या मुलांना बालेवाडी येथे निवड चाचणीसाठी पाठवले जाणार असून या चाचणीतून राज्यातील वीस मुलांना जर्मनीतील म्यूनिच येथील एफ.सी बायर्न फुटबॉल क्लब च्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी दिली आहे.