प्रतिनिधी, जळगाव : संक्रांत नंतर हळूहळू थंडी कमी होत जाते आणि उन्हाची तीव्रता वाढत जात असते. जळगाव जिल्हा म्हटलं तर फेब्रुवारीपासूनच उन्हाची चाहूल मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने थंड पाणी पिण्यासाठी नागरिक आसुसलेला असतो. सध्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक व्यवसायिक दुकानावर पाण्याच्या जार ठेवण्यात आलेला असतो. काही फ्रीजच्या पाण्यावर तहान भागवत असतात परंतु गरिबा घरचा फ्रिज समजला जाणारा मातीच्या माठातील पाण्याची चवच काही निराळी असते. यंदा देखील माठ निर्मिती करणारे कारागीर माठ बनविण्यात मग्न झाले आहेत. दिवाळी झाल्याच्या एका महिन्यानंतर माठ बनविण्यासाठी कामाला लागत असतात माठ बनवण्याचे काम अगदी मेहनतीच असल्याने आणि आता पाण्याचे जार तसेच फ्रिज असे आधुनिक यंत्रणा मुळे मातीच्या माठ विक्रीवर याचा काहीसा परिणाम झालेला आहे. खर्चही तेवढा आहे मेहनत देखील जास्त आहे आणि त्याच्याबदल्यात मोबदला कमी मिळतो परंतु पारंपारिक व्यवसाय असल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी माठ निर्मितीसाठी संपूर्ण कुटुंब कामाला लागत असतो. परंतु, आता माठ बनवण्याची मेहनत मोठ्या प्रमाणावर असल्याने आताची जी पिढी आहे हे मुलं आहे ते हे काम करण्यास तयार नाहीत जे आधीपासून हे काम करतायेत तेवढेच राहिले तर येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना माठ मिळणं देखील कठीण होईल, अशी खंत देखील माठ तयार करणाऱ्या कारागीराने व्यक्त केली आहे.
