प्रतिनिधी , मुंबई : शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘दुर्ग’ अंकाने तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘साहित्य आभा’ य दिवाळी अंक प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले,असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.तर या दिवाळी अंक स्पर्धेपासून बक्षिसांच्या रक्कमेत वाढ केली असल्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले.त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ७५ हजारावरून ०१ लाख रुपये, तर जिल्हास्तरीय स्पर्धेत ३० हजारांचे बक्षिस ४० हजार रुपये करण्यात आले आहे.
