प्रतिनिधी, नाशिक : कळवण तालुक्यातील नांदूरीपोलीस स्टेशनचे नव्याने रूप पालटले असून आता जनतेच्या सेवेसाठी 25 ते 30 वर्षे न गळणारीसुसज्ज पोलीस चौकी नागरिकांच्या सेवेसाठी तयार झाले असून त्याचे मी आज लोकार्पण करत असल्याचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले .या कार्यक्रमाला कळवण सुरगाणाचे आमदार नितीन पवार , कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार , डी वाय एस पी अमोल गायकवाड, पोलीस स्टेशनचे पीआय समाधान नागरे, अभोणा पोलीस स्टेशन एपीआय नितीन शिंदे वनी पोलीस स्टेशनचे एपीआय स्वप्निल राजपूत तसेच पीएसआय भवन पाटोळे पीएसआय खाडे पोलीस नाईक योगेश गवळी नांदुरी गावाचे सरपंच राऊत सप्तशृंगी गडावरील न्यासाचे कर्मचारी सप्तशृंगी गड ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या जागेत पोलीस चौकी सुसज्ज उभे राहिले असे राजेश गवळी आदी मान्यवरांच्या साक्षीने लोकार्पण सोहळा करण्यात आला .
