प्रतिनिधी, बुलडाणा : विदर्भात महालक्ष्मीच्या उत्सवाची परंपरा जपली जात असते..आज गौरींचे घरोघरी आगमन होत आहे.. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सण, उत्सवावर निर्बंध आले होते. परंतु गौरीचा हा उत्सव घरात साजरा होत असल्याने अडीच दिवसांच्या या उत्सवाची परंपरा कोरोना काळातही जपली गेली.. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले जीवन संपविले आहे यातच आपला देश स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे..त्या अनुषंगाने आज बुलढाणा येथील डॉ.गायत्री सावजी यांनी आपल्या घरी “आठवण शौर्याची जाणीव संकल्पांची” या थीम मध्ये देशाच्या स्वातंत्र्यात सहभागी असलेल्या हुतात्म्यांचा महापुरुषांचे देखावे तसेच यावेळी 26/11 मध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शहिदांना यावेळी श्रद्धांजली ही वाहिली आहे. तसेच भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रात केले जाते. शास्त्रानुसार, गौरी ही गणपती आई आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण समजली जाते. तसेच विदर्भात गणरायाच्या आगमनानंतर दोन दिवसाने महालक्ष्मीचे घरोघरी आगमन होते.यास महालक्ष्मी माहेरला येते, असे म्हटले जाते. ज्येष्ठा, कनिष्ठा या आपला मुलगा व मुलीसह माहेरी येतात.त्यांच्यासाठी सडा, रांगोळी करून मायेच्या पायघड्या घातल्या जातात.त्यांच्या स्वागताला सारं घर आनंदाने न्हाऊन निघतं.तीन दिवसांचं त्यांचं माहेरपण; पण त्यात मायेचे कोडकौतुकाचे किती पदर दिसतात. त्या कौतुकाचंच तर नाव माहेर असतं.पहिल्या दिवशी तिचे जोरदार स्वागत केले जाते. दुसऱ्या दिवशी पूजन करून नैवेद्य दिला जातो आणि तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीला निरोप दिला जातो.या दिवशी गृहिणी एकामेकीच्या घरी जाऊन तेथील महालक्ष्मीचे दर्शन घेतात.
