जनतेज न्युज

महिलांच्या गळ्यातून चैनस्नॅचिंग करणाऱ्या चोरटयास सातपूर गुन्हे शोध पथकाने रंगेहाथ पकडले

प्रतिनिधी, नाशिक : सातपुरच्या राधा कृष्ण नगर येथे राहणाऱ्या प्राची पुरुषोत्तम बाबर हया मुलास शाळेत सोडण्यासाठी राधाकृष्णनगर मधील जयकृष्ण चौकातुन पायी जात असतांना त्यांच्या समोरच्या बाजूने चैन स्नॅचर मोटार सायकलवर येवून काही कळायचे आत त्यांच्या गळ्यातील ३३,०००/- रु. किमतीचे सोन्याचे ८ ग्रॅमवजनाचे मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची घटना समोर आली होती,याबाबत त्यांनी सातपूर पोलसंत फिर्याद दिली होती.या गुन्हयाचा तपास करत असताना सातपूर पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली, चैनस्नॅचर आरोपीने काळे रंगाचे जॅकेट, लाल काळे रंगाचे हेलमेट, तसेच काळे रंगाची होंडा शाईन मोटारसायकल, टाकीला लाल पट्टे असलेली निष्पन्न झाली.त्यांनतर सातपूर गुन्हे शोध पथकाच्या तिन टिम या आरोपींच्या शोधत रवाना झाल्या होत्या,त्यांनतर सदर आरोपीताचा शोध घेत असतांना हिंदी शाळा परीसर श्रमिक नगर, सातपुर येथून घटनेतील वर्णनाचा एक इसम सातपूर पोलीस कर्मचारी यांना मोटारसायकलवर जातांना दिसला. सदर इसमास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तो जोरात पळून जात होता. त्याचा संशय बळावल्याने त्याचा पाठलाग करून त्यास हिंदी शाळा, श्रमिक नगर येथे पकडले त्यांनतर इतर पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने संशयिताला पोलीस पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याचे नाव चंद्रकांत कौतिक केदारे असल्याचे सांगितले व त्याने या आधी देखील सातपुर पो.स्टे. हधीत ०३ चैनस्नॅचिंग केल्याची कबुली दिली व चोरलेले सोने अमिक नगर ,सातपूर इथल्या कृष्णा दिलीप टाक या सराफाला विक्री केले असल्याचे सांगितले त्यांनतर यातील सराफ याने सदरचे सोने हे चोरीचे असल्याचे माहीत असुनही अटक आरोपीकडुन वारंवार विकत घेतल्याचे निष्पन्न झाल्याने संशयित सोनारासही सदर गुन्हयात अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे