प्रतिनिधि, ठाणे : गौराईचे स्वागत करताना महिलावर्गाचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणेशोत्सवातील महत्त्वाचा सण म्हणजे गौरी आगमन. गणेशोत्सवात गणपती पाठोपाठ दोन दिवसांनी गौरीचं आगमन झालं. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन झालं. ग्रामीण भागात गौरी पूजनाला ‘महालक्ष्मी पूजन’ असेही म्हणतात. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करताना महिलांनी गौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ठाण्यातील मानपाडा येथील दत्तात्रय भागोजी काटे यांच्या घरी गौरी चे आगमन झाले. ह्या आगमन झालेल्या गौरीचे पारंपरिक वेशभूषेत आणि गौरीला नैवेद्याच्या भोग चढवून गौरीचे सर्व कुटुंबीयांनी विशेष म्हणजे महिला वर्गाने आगमन केले.
