प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : गेले दोन वर्ष करण्याचा कोरोना प्रादुर्भाव असल्याने कुठलेही सण साजरे झाले नाही मात्र यंदा पत्ती उत्साहानंतर नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा होत आहे. दिवसापासून नवरात्री उत्सवामध्ये कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या भक्तीने व उत्साहाने देवीची स्थापना अनेक मंडळांनी केली. कल्याण, डोंबिवलीत ही मोठ्या प्रमाणात नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.आज दोन्ही शहरांमध्ये सार्वजनिक मंडळाच्या देवींचे विसर्जन होत आहे.त्याचप्रमाणे कचोरे गावतील किन्नरांच्या देवीचे विसर्जन होत आहे. यावेळी ठाकुर्ली कचोरे गाव ते कल्याण खाडी परिसरातील तृतीयपंथीयांकडून मिरवणूक काढण्यात आली होती.वाजता गाजत ढोल आणि ताशा च्या आवाजात ही मिरवणूक काढण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.
