प्रतिनिधी , सातारा : कास पठारानजीक कास महोत्सवाचे आयोजन 7 ते 9 या दरम्यान करण्यात आले आहे.. याचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.3 दिवस येथे गावरान खड्याजत्रा,शेतीबाजार, ग्रामोद्योग प्रदर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी बोलताना खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजेंनी केलेल्या कास महोत्सवाला उत्तर दिले आहे.. या ठिकाणी आयोजित केलेल्या महोत्सवाला पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त करत या महोत्सवाला विरोध करणाऱ्यांना मी फारसे महत्व देत नाही.. त्यासाठी किती एनर्जी घालवायची, उत्तर देणे पण मी कमीपणा समजतो असे सांगत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना टोला लगावला.
