जनतेज न्युज

तुर व कपाशी पिकावर मररोगाचा प्रकोप; अतिथंडीच्या दवाने शेतकऱ्यांचे नुकसान

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदुरबाजार तालुक्यातील तुर व कपाशी पिकाचे मररोगाने तसेच अतिथंडीच्या दवाने नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.18 ते 22 तारखेच्या दरम्यान संपूर्ण चांदुरबाजार तालुक्यात अतिथंडीच्या दवामुळे तुर व कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी अतिवृष्टी व सततच्या पावसाने हवालदिल असतांना दवाचे नवीन संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी हा अतिशय बिकट परिस्थितीत असून या संकटाचा सामना करावा तरी कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे येणारे पिक हातातून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे, त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अनुदान मिळालेले नसल्यामुळे अनुदान देण्यात येऊन पिक विमा मिळावा, अशी मागणी चांदुरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. रब्बीचे तुर व कपाशीचे पिक हातातून गेल्यावरही चना किंवा गव्हासाठी मदत मिळावी म्हणून शेतकऱ्याला शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहे.