जनतेज न्युज

खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश खामकर याला अटक करण्यात पोलिसांकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेधार्थ पीडित फिर्यादी पत्नी व दोन मुलींसह जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलनास बसणार.

प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी व खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ता खामकर यांचे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे भा द वि कलम 385, 506 व ॲट्रॉसिटी नुसार सुमारे दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. तथापि त्याला अटक करण्यात शिवाजीनगर पोलीसांकडून जाणून बुजून दिरंगाई करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ पीडित फिर्यादी श्री. सुनील चराटे हे त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलींसह जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसणार असल्याची माहिती चर्मकार विकास संघ चे अध्यक्ष बनसोड यांनी येथे दिली आहे.