जनतेज न्युज

खा. रामदास आठवले यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे आंदोलन

प्रतिनिधी, औरंगाबाद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या खासदार रामदास आठवले यांना निलंबित करण्यासाठी व देशातील नागरिकांच्या धार्मिक भावना भडकवून दहशतवादी करावया करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अभिनव भारत सनातन संस्था व सनातन धर्माच्या दहशतवादी संघटनावर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन विद्यार्थी सेना आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने आंदोलन करण्यात आले आहे आंदोलन करते सचिन निकम म्हणाले की भाजप राज्यमंत्री तथा आर एस एस या दहशतवादी संघटनेचे हस्तक रामदास आठवले यांनी नागपूर येथे “इच्छा नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला” असे निराधार खोडसळ व बौद्ध आणि यांच्या भावना दुखावणारा बेताल वक्तव्य केले आहे ज्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समस्त देशवासियाचे य प्रेरणास्थान विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या मातीतला मूळ बौद्ध धम्म पूर्ण जीवित करून आपल्या लाखो अनयांना अस्पष्टतेच्या दाढेतून दलदलीतून बाहेर काढले आहे परंतु यामुळे विचारलेल्या धर्मार्थ प्रवृत्तीचे आरएसएस सारखे दहशतवादी संघटन सातत्याने बुद्ध धम्मा विषयी लोकांमध्ये संभ्रम पसरण्याचे काम रामदास आठवले सारख्या त्यांच्या हस्तकाच्या माध्यमातून करत आहे असा आरोप यावेळी मराठवाडा प्रदेशाध्यक्ष सचिन निकम यांनी केले आहे