प्रतिनिधी , बुलडाणा : खामगाव आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता आज खामगाव पंचायत समितीच्या १६ जागांपैकी ८ जागांकरीता आरक्षण सोडत काढण्यात आली. तहसील कार्यालयातील हॉलमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली.खामगाव पंचायत समितीच्या १६ पैकी ओबीसींकरीता ४ जागा आरक्षीत असून अनुसूचीत जाती (एससी) करीता ३, अनुसूचीत जमाती (एसटी) करीता १ जागा राखीव असणार आहे. तर उर्वरित ८ जागा सर्वसाधारण ठेवण्यात आल्या आहेत. १६ पैकी ८ जागा या महिलांकरीता आरक्षीत ठेवण्यात आलेल्या आहेत. उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव व तहसिलदार अतुल पाटोळे तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजपूत यांच्या यांच्या उपस्तिथित ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
