जनतेज न्युज

पैश्याची बॅग घेऊन जाणाऱ्या मिरची व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला 3 इसमांनी लुटले

प्रतिनिधी , नागपूर : नागपूरच्या यशोधरा पोलीस स्टेशन अंतर्गत चिखली उड्डाणपुलावर पैश्याची बॅग घेऊन जाणाऱ्या मिरची व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला 3 इसमांनी लुटले. हा कर्मचारी आपल्या दुचाकीने कळमना मार्केट वरून जरीपटका येथे जात असता पाऊस आल्यामुळे चिखली  उड्डाणपुलावर रेनकोट घालण्यासाठी थांबला असता 3 अनोळखी इसमांनी या कर्मचाऱ्याला अडवून दमदाटी करून त्याच्याकडे असलेली व्यापाऱ्यांची 20 लाख रुपये असलेली बेग घेवून पसार झाले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत. इतकी मोठी रक्कम घेऊन जात असल्याची माहिती फक्त काही लोकांनाच होती त्यामुळे पहानीतील व्यक्तीच्या माहितीवरून ही लूट झाली असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत असून पोलीस त्या देशीने देखील तपास करीत आहेत.