जनतेज न्युज

अन्नधान्य व खाद्य पदार्थांवर जीएसटी विरोधात वंचित आक्रमक

प्रतिनिधी , अमरावती : अन्नधान्य व खाद्यपदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आल्याने देशभरात आंदोलन सुरू आहेत,अमरावतीत सुद्धा वंचित बहुजन आघाडी या विरोधात आक्रमक झाली आहे, त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवशीय धरणे आंदोलन सुरू आहे,

अन्नधान्य व खाद्य पदार्थांवर जीएसटी लावल्याने पुन्हा महागाईत भर पडली आहे असा आरोप त्यांनी केला त्यामुळे तातडीने केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचा विचार करावा व दरवाढ व जीएसटी रद्द करावी या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे