जनतेज न्युज

खामगावचे शक्तिपीठ दर्शनासाठी २४ तास राहणार खुले

प्रतिनिधी , बुलडाणा : घाटपुरी संस्थान च्या प्राचीन काळातिल मंदिर आहे.तर भवानी मातेची स्थापना १५० वर्षापूर्वी झालेली आहे.तुळजापुर ची प्रतिकृती म्हणून भक्त खामगावच्या तुळजापुरला भवानी मातेच्या दर्शनाला भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येतात. खामगाव शहरातील शक्तिपीठ घाटपुरी मंदिर नवरात्रोत्सवात २४ तास खुले राहणार आहे.भाविकांची वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी तसेच भाविकांना त्यांच्या सोयीनुसार दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घाटपुरी येथील जगदंबा संस्थानने हा निर्णय घेतला आहे. घाटपुरी संस्थान हे पंचक्रोशीत प्रसिद्ध असून या ठिकाणी विविध राज्यातून भाविक तुळजापुर ची प्रतिकृती म्हणून भक्त खामगावच्या तुळजापुरला भवानी मातेच्या दर्शनाला भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येत असतात.घाटपुरी येथील जागती ज्योत जगदंबा देवी मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते.यावर्षी सोमवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दृष्टीने संस्थानतर्फे नियोजन करण्यात आले आहे.घाटपुरी येथील श्री जगदंबा देवी संस्थानमध्ये यंदा घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना करण्यात येते.