प्रतिनिधी, बुलडाणा : खामगाव शहर व शिवाजी नगर पोलिस स्टेशन यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर मॉक ड्रीलचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. एखाद्या वेळेस अचानक दंगा अथवा आग लागल्यास ते नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काय करावे, याचे प्रात्यक्षिक यावेळी पोलिस दलाच्या वतीने सादर करण्यात आले. यामध्ये गोळीबार, आग विझविणे आदींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर शहारातील विवीध मार्गाने रूट मार्च काढण्यात आला.
