जनतेज न्युज

खडक पोलिसातील घोणे आणि बेगाने अमोल आंदेकरला लावलाय लळा आणि हे पुराणिक म्हणतात पळा पळा…

प्रतिनिधी, पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्ततील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेश पोरानिक यांनी मागील सहा महिन्यांपासून पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील सर्व प्रकारचे जुगार अड्डे क्लब वेश्याव्यवसाय यांच्यावर कठोर कारवाई केली आहे खडक पोलीस स्टेशन हद्दीतील नंदू नाईक व अमोल आंदेकर या कुख्यात गॅम्बलर माफिया विरुद्ध कठोर कारवाई करून जुगार अड्डे उध्वस्त केले होते त्यांची कारवाई झाल्यानंतर देखील खडक पोलीस स्टेशन हद्दीत आजही अमोल आंदेकर यांचा जुगार अड्डा सुरू असून या जुगार अड्ड्यात पुणे शहर पोलीस दलातील काही पोलिसांची भागीदारी असल्याचे समजले तसेच आंदेकर नंदू नाईक याचा जुगार अड्डा चालू ठेवण्यास खडक पोलीस स्टेशनचे अवैद्य धंद्यांचे वसूलदार श्री होणे व श्री बेग यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केल्याने अमोल आंदेकर व नंदू नाईक या गॅम्बलरची मुजोरी वडती आहे फोळवला चवकपासून ते वेताळ पर्यंतच्या चौकात मटका घेण्यासाठी सुमारे १५ ते १८ मटका घेणारे बसले आहेत तसेच अंबा माता मंदिराच्या बोळीमध्ये क्लब जुगार अड्डा सुरू असून तेथे सुमारे ७ ते ८ टेबल सुरू आहेत थोडक्यात वीस दिवसांपूर्वी ज्या आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली त्याच आंदेकरने पुन्हा धंदा सुरू केला आहे श्री वेग व घोणे या पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यातून हा धंदा सुरू असल्याचे दिसून येत आहे.