जनतेज न्युज

बाबा भिडे पूल गेला जलपर्णी खाली

प्रतिनिधी, पुणे : बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की पाऊस झाला असा अंदाज वर्षानुवर्षे पुणेकर वर्तवतात. पण यावर्षी बाबा भिडे पूल हा जलपर्णी खाली गेल्या चित्र दिसून येत आहे. .पुणे महापालिकेने मात्र नदी सुधार प्रकल्प किंवा जायका प्रकल्प नावाखाली कोणती काम केलेत हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे ड्रेनेज तुंबण्याची शक्यता आहे आणि ड्रेनेजवर  पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या जलपर्णी मध्ये साप आणि अन्य धोकादायक प्राणी आढळून येतात आणि ते स्थानिकांच्या  घरामध्ये जाण्याची शक्यता आहे.खडकवासला, टेमघर,वरसगाव,पानशेत या चारही धरणात काल रात्री पासून पाण्याचा मोठ्या प्रमाणात  विसर्ग सोडला जात आहे. या मुळे बाबा भिडे पूल हिते जलपर्णी चा मोठा साठा साठलेला पहायला मिळत आहे.