जनतेज न्युज

सरला बेट येथे भाविकांनी गुरुपौर्णिमा निमित्ताने दर्शनाला येऊ नये; सहाय्यक पोलीस निरीक्षक रोडगे

प्रतिनिधी, औरंगाबाद : आज मंगळवार 12 जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विरगाव पोलीस स्टेशन विरमगाव हद्दीतील सरला बेट इथे गुरुपौर्णिमा निमित्ताने अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांनी सरला बेट इथे दर्शनासाठी येऊ नये असा आदेश जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने दिला असून या परिसरामध्ये पावसाची सतत दार सुरू असल्याने अग्निशामक विभागाचा एक पथक आणि एनडीआ एफ चा एक पथक वांजरगाव येथे मुक्कामी राहणार असल्याची ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे,
सदरील परिसरात सुरू असलेला पाऊस वाणी गोदावरी नदीला वाढलेला पूर यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरला बेट वरती कोणीही दर्शनाला येऊ नये असा सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आज रोजी केले आहे.