जनतेज न्युज

क्रीडा विभागा अंतर्गत दिव्यांगाच्या मैदानी क्रीडा व जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी, औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्त औरंगाबाद महानगरपालिका क्रीडा विभाग व औरंगाबाद जिल्हा पॅरालम्पिक असोसिएशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हास्तरीय दिव्यांगाच्या मैदानी जलतरण स्पर्धेचे आयोजन मनपा सिध्दार्थ जलतरण तलाव औरंगाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते .सदरील स्पर्धामध्ये दिव्यांग खेळाडू मुले मनपा सिध्दार्थ जलतरण तलाव या ठिकाणी जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील येथे जिल्ह्यातूनही आले होते दिव्यांग खेळाडूंमध्ये मानसिक अपंग अर्धांग वायू मेंटली ग्रस्त अशा दिव्यांग यांनी स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेमधून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल जेणेकरून त्यांना शासकीय नोकरीमध्ये त्याचा उपयोग होईल असे जिल्हा जलतरण स्पर्धेचे देशमुख यांनी सांगितले.या स्पर्धामध्ये सहभागी खेळाडू मधून विजेता, उपविजेता इ. उत्कृष्ठ पारितोषीक आयोजकां मार्फत देण्यात येणार आहे. यावेळी  म्हणतात अपर्णा थेटे,मा.उपआयुक्त तथा दिव्यांग कक्ष प्रमुख  नंदा गायकवाड व क्रीडा अधिकारी बालय्या संजीव प्रसाद , अभिजीत देशमुख उपस्थित होते.