प्रतिनिधी, बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्य़ातील नळगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाणात जलपर्णी झाली आहे. यामुळे नदीतील पाणी पूर्णपणे दूषित होत असून नदी असून देखील जनावरांना पाणी पाजण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. नदीतील जलपर्णी काढण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केला जातो. मात्र नदीतून बाहेर काढलेली जलपर्णी काठावरच टाकली जात असल्याने पुन्हा ती नदीत पडत असल्याची माहिती मिळत आहे. नदीतून जलपर्णी नष्ट होत नसल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
